राधारानीचा लुक करणे तमन्ना भाटियाला पडले महागात ; युजर्सने केले ट्रोल

Entertainment । ‘स्त्री 2’मधील कॅमिओनंतर अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. अभिनेत्रीला इंस्टाग्राम पोस्टमुळे ट्रोलिंग सामना करावा लागत आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी तमन्नाने तिचा फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती राधारानीच्या लूकमध्ये दिसत होती. हे फोटो एका कपड्याच्या ब्रँडच्या फोटोशूटचे होते, ज्याची थीम कृष्ण लीलावर आधारित होती. सतत ट्रोल होत असताना तमन्नाने आता तिच्या इंस्टाग्रामवरून राधारानी लूकचे सर्व फोटो हटवले आहेत.
तमन्ना भाटियाचे हे फोटोशूट प्रसिद्ध फॅशन डिझायनर करण तौरानीच्या लक्झरी क्लोदिंग ब्रँड तौरानी फॅशनसाठी करण्यात आले होते, ज्याला ‘लीला – द डिव्हाईन इल्युजन ऑफ लव्ह’ असे नाव देण्यात आले होते. फोटोशूटमध्ये भगवान कृष्ण आणि राधा राणी यांच्यात होणाऱ्या कृष्ण लीला वेगवेगळ्या स्टेजवर दाखवण्यात आल्या होत्या. मात्र, या लूकवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काही लोकांनी या शूटला वाईट म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली.
तमन्नाच्या फोटोशूटला धर्माशी जोडताना अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या फोटोंमधून श्रीकृष्ण आणि राधारानी यांच्यातील पवित्र नाते चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, असे ट्रोलर्स म्हणत आहे. अनेकांनी तमन्नाच्या कपड्यांबद्दल वाईट कमेंटही केल्या. तर चाहत्यांनी ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर देत अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे.
युजर्सच्या या ट्रोलिंगनंतर तमन्ना भाटियाने तिच्या सोशल मीडियावरून फोटोशूटच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या. एवढेच नाही तर फॅशन डिझायनर करण तौरानीनेही या फोटोशूटशी संबंधित सर्व पोस्ट त्याच्या अकाउंटवरून डिलीट केल्या आहेत. तमन्नाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती प्रत्येक फोटोत खूपच क्यूट दिसत होती. राधारानीची गोष्ट या फोटोशूटच्या माध्यमातून सांगण्यात आली.
जेव्हा तमन्नाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही सर्व फोटो शेअर केले तेव्हा तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी संकोच न करता म्हणू शकते की माझ्या १८ वर्षांच्या कारकिर्दीतील ही माझी आतापर्यंतची सर्वोत्तम मोहीम होती. आमचा प्रत्येक शूट प्रेमाने भरलेला आहे, पण हे एक अद्वितीय आहे.’ मात्र आता तिने हे सर्वच फोटो डिलीट केले आहे.






