कृती सेनन – सिद्धार्थ मल्होत्रा करणार रोमान्स

Entertainment । अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहे. नुकताच तो ‘योद्धा’मध्ये दिसला होता. सिद्धार्थ मल्होत्राने याआधीच सैनिकाच्या भूमिकेतील पात्रातून प्रेक्षकांच्या मनात वेगेळे उडवून दिली आहे. या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी त्याच्या अभिनयाने लोकांच्या मनावर खूप छाप पाडली.
सध्या त्याच्या खात्यात अनेक मोठे चित्रपट आहे. त्यानुसार नुकतेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि क्रिती सेनन मॅडॉकच्या ऑफिसमध्ये दिसला. तेव्हापासून दोघेही एकत्र चित्रपट करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि क्रिती सेननला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. रिपोर्टनुसार सुरुवातीला सिद्धार्थ मल्होत्रा ‘स्पायडर’ नावाच्या चित्रपटाशी संबंधित होता. मात्र आता तो ते सोडून दुसऱ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे.
मुराद खेतानी निर्मित देसी मास ॲक्शन एंटरटेनर चित्रपटात सिद्धार्थ दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या कारकिर्दीसाठी हे खूप महत्त्वाचे असेल. अलीकडेच तो एका पूर्ण हाय-ऑक्टेन ॲक्शन चित्रपटात दिसला होता. आता त्याला ॲक्शन चित्रपटांमधून रोमान्सकडे वळावे लागणार आहे. अलीकडेच क्रिती सेनन ‘क्रू’ चित्रपटात दिसली.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. त्याचबरोबर ती लवकरच अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हे वाचाल का ? अनिल कपूरने ‘हाऊसफुल 5’ नाकारला





