दीपिका- रणवीरचा फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Entertainment | अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने एकत्र प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. या जोडप्याने गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करताच, चाहते गुड न्यूजची वाट पाहत आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग 2024 मध्ये, सप्टेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करतील.
दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा त्यांच्या छोट्या पाहुण्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून दीपिका-रणवीरच्या घरात धमाल मस्ती सुरू असल्याचा दावा कपलचे चाहते करत आहे. व्हायरल होणार हा फोटो फेक असून सध्या हा फेक फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे.
या फोटोत दीपिका-रणवीरचा हॉस्पिटलमध्ये आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणवीर सिंगने जन्मलेल्या लहान मुलाला आपल्या मांडीत धरले आहे. दीपिका रणवीरजवळ हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र दीपिका-रणवीरचा व्हायरल झालेला फोटो मूळ नाही. हा फोटो AI च्या माध्यमातून एडिट करण्यात आला आहे. या जोडप्याचा फेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा फोटो पूर्णपणे फेक आहे. या फोटोत अजिबात तथ्य नाही. दीपिका पदुकोण महिन्याभरानंतर म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे.
दरम्यान दीपिकाच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ती नुकतीच कल्की 2898 एडीमध्ये दिसली होती. दीपिका आगामी काळात रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. रणवीर सिंग शेवटचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसला होता. सध्या रणवीर सिंगकडे फरहान अख्तरचा ‘डॉन ३’ आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.





