#ENGvNZ 2nd Test : बर्न्स-रूटची शतके; इंग्लंड ५ बाद २६९

हॅमिल्टन : न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेतील दुस-या सामन्यातील पहिल्या डावात राॅरी बर्न्स आणि जो रूटच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने तिस-या दिवसअखेर ५ बाद २६९ अशी मजल मारली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडने ३७५ धावा केल्या आहेत. इंग्लंड अजूनही १०६ धावांनी पिछाडीवर आहे.
Rain forces early stumps at Seddon Park!
Centuries from Rory Burns (101) and Joe Root (114*) help England finish the day on 269/5, but the visitors are still 106 runs behind.#NZvENG SCORECARD 👇https://t.co/eBrKe7xmfM pic.twitter.com/NJx9ZNUBX0
— ICC (@ICC) December 1, 2019
कालच्या २ बाद ३९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आज बर्न्स आणि जो रूटनी सावध सुरूवात करत तिस-या विकेटसाठी १७७ धावांची भागिदारी केली. राॅरी बर्न्स १०१ धावांवर असताना जीत रावलने त्याला धावबाद केले. धावबाद होण्यापूर्वी बर्न्सने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. त्यानंतर फलंदाजीस आलेला बेन स्टोक्स २६ आणि जक क्राॅल ०१ धावांवर झटपट बाद झाले. मात्र जो रूटने एका बाजूनं संघाचा डाव सावरत कसोटी कारकिर्दीतील १७ वे शतक झळकावले. पावसामुळं तिस-या दिवसांचा खेळ लवकर थांबविण्यात आला. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आॅली पोप ०४, तर जो रूट ११४ धावांवर खेळत होते.
धावफलक : न्यूझीलंड : पहिला डाव : सर्वबाद ३७५( टाॅम लॅथम १०५, वाटलिंग ५५, डॅरेल मिचेल ७३, स्टुअर्ट ब्राॅड ४-७३) वि. इंग्लंड : पहिला डाव : ९९.४ षटकात ५ बाद २६९( राॅरी बर्न्स १०१, जो रूट खेळत आहे ११४, टिम साउदी २-६३, मैट हेनरी १-५६, नील वैगनर १-७६)





