इसीबीने खजिना उघडला; तब्बल 570 कोटींची मदत

लंडन – इग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (इसीबी) करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 570 कोटी रुपयांची मदत दिली आहे. या कामी इतकी मोठी रक्कम देणारे इसीबी हे पहिलेच क्रिकेट मंडळ आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असा टेंभा मिरवणारे बीसीसीआयने केवळ 51 कोटी रुपये मदत केली होती, त्यावर सोशल मीडियावर सातत्याने टीका होत आहे. तुम्ही मदत करत आहात का भीक देत आहात, अशा शब्दात नेटकऱ्यांनी मंडळाला ट्रोल केले आहे.
सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट मंडळांना बिग थ्री असे संबोधले जाते. जागतिक क्रिकेटवर याच तीन देशांचे वर्चस्व प्रस्थापीत झालेले आहे. तरीही भारत व ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची बरोबरी केल्यास खूपच तोकडी मदत केली आहे. या तिनही देशांत लॉकडाऊन आहे.
इसीबीने 2020-21 या कॅलेंडर वर्षात मंडळाशी संलग्न कौंटी क्रिकेट संघटनांना 40 दशलक्ष पाऊंड देण्याची तरतुद आपल्या अंदाजपत्रकात केली होती, ती रद्द करण्यात आली असून त्याऐवजी करोनाबाधितांच्या मदतीसाठी 570 कोटी रुपये देण्यावर मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले





