England Playing XI : भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठी बातमी! २४ तास आधीच जाहीर केली प्लेइंग इलेव्हन; ‘या’ खेळाडूचे पदार्पण
England Playing XI : या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याच्या तब्बल २४ तास आधीच या संघाने प्लेइंग इलेव्हन जाहीर करून सर्वांना चकित केले आहे.

IND vs ENG 2nd T20I Manchester England Playing XI Announce : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा थरार शनिवार, ४ जुलै रोजी मँचेस्टर येथे रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याच्या तब्बल २४ तास आधीच यजमान इंग्लंड संघाने प्लेइंग इलेव्हन जाहीर करून सर्वांना चकित केले आहे. पहिल्या सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन झाले आहे.
तसेच देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या जोश टंग याला आपले आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण (Debut) करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या दोघांच्या एन्ट्रीमुळे साकिब महमूद आणि ल्यूक वूड यांना संघातून बाहेर जावे लागले आहे. उभय संघांमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता.
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची दाट शक्यता –
इंग्लंडने आपला संघ जाहीर केला असला, तरी भारतीय संघाची ‘प्लेइंग इलेव्हन’ शनिवारी संध्याकाळी ६:३० वाजता टॉसच्या वेळीच स्पष्ट होईल. मात्र, या सामन्यात १५ वर्षांच्या वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याला संजू सॅमसनच्या जागी पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सॅमसन गेल्या सामन्यात ७ चेंडूंत केवळ १ धाव करून बाद झाला होता, तर आयर्लंड दौऱ्यावरही तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. यष्टिरक्षणाची जबाबदारी इशान किशन सांभाळत असल्याने सॅमसनच्या जागी वैभवला सलामीला उतरवले जाऊ शकते.
Two changes for Manchester 🔁
Click below for the full story:
— England Cricket (@englandcricket) July 3, 2026
कर्णधार श्रेयस अय्यरला पहिल्या विजयाची प्रतीक्षा –
भारतीय संघाचा नवा टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर याला अद्याप कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विजयाचे खाते उघडता आलेले नाही. आयर्लंडविरुद्ध भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता, तर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे मँचेस्टरमधील हा सामना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी परीक्षा पाहणारा ठरेल.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग.





