अभिनेता अक्षय केळकरच्या घरी लगीनघाई सुरू; शेअर केले केळवणाचे फोटो

Akshay Kelkar | ‘बिग बॉस मराठी’ सीझन 4 चा विजेता आणि लोकप्रिय मराठी अभिनेता अक्षय केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच अक्षयच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने आपल्या नात्याची कबुली देत गर्लफ्रेंडची ओळख चाहत्यांना करून दिली होती. यानंतर आता अक्षयच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे.
अक्षय केळकरच्या आयुष्यातील ‘रमा’ म्हणजे साधना काकतकरसोबत तो लग्नबंधनात अडकणार आहे. मे 2025 मध्ये दोघांचं लग्न होणार असल्याचं अक्षयने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. त्यानंतर आता अक्षयचं पहिलं ‘केळवण’ अगदी खास पद्धतीने साजरं झालं आहे. अभिनेत्री समृद्धी केळकर हिने या दोघांचेही केळवण खास पद्धतीत साजरं केलं.
केळवणासाठी खास बेत
अक्षय आणि साधनासाठी समृद्धी केळकरने खूप खास बेत आखला होता. यात आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी पाहायला मिळत आहे. फुलांनी तिने घरी सजावट केली आहे. तर केळीच्या पानावर ‘अक्षय-साधनाचं केळवण’ असे लिहिलं आहे. तिने अक्षयच्या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यानंतर दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अक्षय आणि साधना गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांच्या सहवासात आहेत. अक्षयने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. अक्षयने आपल्या इंस्टाग्रामवर साधनासोबतचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. Akshay Kelkar |
दरम्यान, साधना काकतकर ही एक गायिका आणि गीतकार आहे. तिने ‘दोन कटिंग 3’ या अक्षयच्या म्युझिक अल्बमसाठी गीतकार आणि गायिका म्हणून काम केले आहे. ती वेगवेगळ्या संगीत अल्बमला आवाज देते. Akshay Kelkar |
हेही वाचा:
Pune News : ऑनलाइन मैत्री करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळी अटक





