ENG vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने इतिहास रचला आहे. ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने केवळ 4.2 षटकात 50 धावा करत विश्वविक्रम केला आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 धावा करण्याच्या विक्रमाची नोंद आता इंग्लंड संघाच्या नावावर झाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडने ही कामगिरी केली. याआधीही कोणत्याही संघाकडून सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम हा इंग्लंडच्याच नावावर होता. 1994 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकात 50 धावा केल्या होत्या.
पाचव्या षटकात पूर्ण झाल्या 50 धावा…
इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर जॅक क्रॉली खाते न उघडताच बाद झाला. मात्र, यामुळे बेन डकेटला काही फरक पडला नाही आणि त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने आपल्या संघासाठी विश्वविक्रम केला. डकेटने कसोटीतही टी-20 प्रमाणे फलंदाजी केली. पाचव्या षटकात इंग्लंडने 50 धावा पूर्ण केल्या तेव्हा बेन डकेट 14 चेंडूत 33 धावांवर तर त्याच्यासोबत ओली पोप 9 चेंडूत 16 धावांवर खेळत होता.
एकही षटकार न मारता केला विश्वविक्रम…
केवळ 4.2 षटकात म्हणजेच 26 चेंडूत 50 धावा करत इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम केला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या काळात इंग्लंडकडून एकही षटकार मारला गेला नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी केवळ चौकार मारून विश्वविक्रम केला.
कसोटीत सर्वात जलद 50 धावा करणारा संघ…
4.2 – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉटिंगहॅम, 2024
4.3 – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओव्हल, 1994
4.6 – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, मँचेस्टर, 2002
5.2 – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, कराची, 2004
5.3 – भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2008
5.3 – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, पोर्ट ऑफ स्पेन, 2023