ENG vs SL 2nd Test (Gus Atkinson Test Century at Lord’s) : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या 10 गडी गमवून 427 धावा केल्या आहेत. या सामन्यात जो रूट आणि आठव्या स्थानावर उतरलेल्या गस एटकिंसन यांची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिंसनने आठव्या क्रमांकावर येत शतक ठोकले आहे. असे फारच क्वचित घडले आहे की एखादा फलंदाज आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला असेल किंवा क्रमाने खाली आला असेल आणि त्याने शतक केले असेल. दरम्यान, एटकिंसनने 2002 चा भारताच्या अजित आगरकरचा म्हणजेच सुमारे 22 वर्षांचा विक्रमही मोडित काढला आहे. आम्ही येथे लॉर्ड्सच्या रेकॉर्डबद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आहे. लॉर्ड्सवर आतापर्यंत 6 फलंदाजांनी केला आहे ‘हा’ पराक्रम इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर आतापर्यंत केवळ 6 खेळाडूंनी 8व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. यापूर्वी 5 खेळाडूंनी ही कामगिरी केली होती. एटकिंसन आता सहावा खेळाडू ठरला आहे. भारताच्या अजित आगरकरने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध आठव्या क्रमांकावर येत या मैदानावर शतक झळकावले होते. अजित आगरकरने भारताच्या दुसऱ्या डावाच्या चौथ्या डावात शतक ठोकलं होतं. तेव्हा त्याने नाबाद 109 धावांची खेळी केली होती. या डावात अजित आगरकरने 16 चौाकार मारले होते. याआधी, इंग्लंडच्या रे इलिंगवर्थने 1969 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर आठव्या क्रमांकावर येत 113 धावांची इनिंग खेळली होती. आता गस एटकिंसन या दोघांच्याही पुढे गेला आहे. लॉर्ड्सवर आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एटकिंसनने 118 धावांची खेळीही खेळली आणि इंग्लंड संघाला मजबूत स्थितीत आणले. PAK vs BAN 2nd Test Day 1 : पाकिस्तान-बांगलादेशच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ…. स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्सच्या मैदानावर रचला होता इतिहास इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने कसोटीत 8व्या किंवा खाली क्रमांकावर येत लॉर्ड्सवर सर्वोच्च धावसंख्या केली. त्याने 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 169 धावांची शानदार खेळी केली होती. या बाबतीत इंग्लंडचा गुब्बी ॲलन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1931 साली न्यूझीलंडविरुद्ध त्याने 122 धावांची इनिंग खेळली होती. वेस्ट इंडिजच्या बर्नार्ड ज्युलियनने 1973 मध्ये इंग्लंडविरुद्ध 8 व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना 121 धावा केल्या होत्या.