ENG vs SL : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन जाहीर, ‘या’ युवा खेळाडूला बनवले उपकर्णधार

ENG vs SL 1st Test :- दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी लढतीसाठी ओली पोपकडे इंग्लंड संघाने नेतृत्व सोपविण्यात आले असून युवा खेळाडू हॅरी ब्रुकची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
श्रीलंका पुरुष संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आला आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे बुधवार पासून पहिल्या कसोटी लढतीला सुरुवात होणार आहे. या लढतीसाठी इंग्लंड कडून संघाची घोषणा करण्यात आली. या लढतीमध्ये इंग्लंडसंघाचे नेतृत्व ओली पोपकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स जून २०२३ नंतर पुन्हा एकदा संघात परतला असून डॅन लॉरेन्स याला झॅक क्रॉली ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. डॅन लॉरेन्सला या लढतीत सलामीवीराची महत्वाची भूमिका करावी लागण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे या हंगामासाठी उपलब्ध नसणार आहे.
या मालिकेतील दुसरी कसोटी लढत २९ ऑगस्टपासून लॉर्ड्स येथे तर तिसरी लढत ६ सप्टेंबर पासून ओव्हल येथे होणार आहे. इंग्लंडने घराच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका ३-० अशी एकतर्फी जिंकली होती. विश्व कसोटी स्पर्धेत इंग्लंडचा संघ सातव्या स्थानावर आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ : ऑली पोप (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड, शोएब बशीर.





