Awarapan 2 : इम्राम हाश्मी आणि दिशा पटानीची रोमँटिक कमेस्ट्री! आवारापन 2 चं पहिलं गाण रिलीज
Awarapan 2 : आता या चित्रपटाचं पहिलं गाण देखील रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Awarapan 2 : नुकताच अभिनेता इम्रान हाश्मीचा बहुप्रतीक्षित ‘अवारापन २’ चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असून, टीझरने चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता या चित्रपटाचं पहिलं गाण देखील रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
‘वे जुनून’ या नावाने हे पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि दिशा पटानी पहिल्यांदाच एकत्र दिसत असून दोघांची रोमँटिक केमेस्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. सय्यद कादरी यांनी या गाण्याचे गीतलेखन, सुबोध शर्मा यांनी गायन, तर मिथुन यांनी संगीत दिलं आहे. या गाण्यातून प्रेम, विरह आणि जुन्या आठवणींचा भावनिक प्रवास उलगडतो. (Awarapan 2 )
इम्रानला दिशामध्ये आपल्या पहिल्या प्रेयसी आलियाची झलक दिसते आणि त्यानंतर त्यांच्या नात्याची सुरुवात होताना दाखवण्यात आली आहे. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी श्रिया सरनच्या फ्लॅशबॅक सीन्सचं कौतुक केलं, तर काहींनी मूळ ‘अवारापन’ चित्रपटातील गाण्यांची आठवणही काढली आहे. (Awarapan 2)
२००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अवारापन’ (Awarapan 2 ) सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. मात्र, कालांतराने तो एक कल्ट क्लासिक चित्रपट ठरला आणि त्यातील गाणी आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
‘अवारापन २’ चे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले असून, इम्रान हाश्मी, दिशा पटानी आणि शबाना आझमी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून इम्रानच्या जुन्या चित्रपटातील आठवणी पुन्हा पाहायला मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
हेही वाचा : Jeetendra : 10 बाय 10 च्या खोलीत काढले दिवस! आज जुहूमध्ये आलिशान बंगला; जीतेंद्र यांचा थक्क करणारा प्रवास

