बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी
Updated On:

जळोची : राज्यभरातील सरकारी-निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने बरोबरच विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज आणि उद्या लाक्षणिक संपाचा इशारा दिला आहे. कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या संपात बारामतीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
नवीन पेन्शन योजनेत अनेक त्रुटी असल्याने जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी. निवृत्तीचे वय 60 करण्यात यावे. तसेच राज्यात सुमारे 2 लाख पदे रिक्त असल्याने त्याचा अतिरिक्त ताणाचा काम आत्ताच्या कर्मचाऱ्यांवर येत आहे. कोरोना महामारी या कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका बजावून ही त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने दोन दिवसीय लाक्षणिक संपाचे हत्यार उपसले आहे.





