Elon Musk on Donald Trump । एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि सल्लागार असलेले अब्जाधीश एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या “वन बिग, ब्युटीफुल बिल” वर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना खुले आव्हान दिले आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या बहुचर्चित विधेयकाचे वर्णन वेडेपणा आणि सामान्य करदात्यांवर ओझे असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी इशारा दिला आहे की, “जर सिनेटने हे विधेयक मंजूर केले तर ते दुसऱ्या दिवशी “अमेरिका पार्टी” नावाचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. हे विधेयक ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मुख्य धोरण आहे, ज्यामध्ये संरक्षण, ऊर्जा आणि सीमा सुरक्षेसाठी मोठ्या बजेटची मागणी आहे, परंतु पोषण आणि आरोग्य सेवांमध्ये कपात करण्याची तरतूद देखील आहे. काँग्रेसच्या बजेट ऑफिसने अहवाल दिला आहे की पुढील दहा वर्षांत, या विधेयकामुळे राष्ट्रीय तूट सुमारे $3.3 ट्रिलियन पर्यंत वाढेल. मस्कचा थेट हल्ला : “ही ‘पोर्की पिग पार्टी'” Elon Musk on Donald Trump मस्कने सोशल मीडियावर पोस्ट करत, “हे विधेयक कर्ज मर्यादा विक्रमी पाच ट्रिलियन डॉलर्सने वाढवते. हे स्पष्ट आहे की आपण आता एका पक्षीय देशात राहतो – ‘पोर्की पिग पार्टी’! आता एका नवीन पक्षाची वेळ आली आहे जो खरोखर लोकांची काळजी घेतो.” असे म्हणत नव्या राजकीय सुरवातीची त्यांनी यावेळी घोषणा केली. त्यांनी रिपब्लिकन नेत्यांवर, विशेषतः हाऊस फ्रीडम कॉकसचे अध्यक्ष अँडी हॅरिसवरही तीव्र हल्ला चढवत, “जर तुम्ही सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली निवडून आलात आणि नंतर सर्वात मोठी कर्ज मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मतदान केले तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे.” असे म्हटले. तर दुसऱ्या दिवशी एक नवीन पक्ष स्थापन होईल – मस्क Elon Musk on Donald Trump एलॉन मस्क यांनी स्पष्ट शब्दात, “जर हे वेडे विधेयक मंजूर झाले तर मी दुसऱ्याच दिवशी ‘अमेरिका पार्टी’ सुरू करेन. डेमोक्रॅट-रिपब्लिकनच्या या एकपक्षीय व्यवस्थेला आपल्याला पर्याय हवा आहे, जेणेकरून सामान्य लोकांचा आवाज उठवता येईल.” असे सांगितले आहे. ट्रम्पशी मैत्री तुटली, आता राजकीय कटुता एकेकाळी ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार असलेले एलॉन मस्क यांना ‘सरकारी कार्यक्षमता विभाग’चे प्रमुख देखील बनवण्यात आले, परंतु लवकरच दोघांमधील मतभेद वाढू लागले. मस्कने दावा केला की, “त्यांच्या पाठिंब्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते.” “माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते, डेमोक्रॅट्स हाऊसवर नियंत्रण ठेवतील आणि रिपब्लिकन सिनेटमध्ये ५१-४९ असतील,” मस्क यांनी ५ जून रोजी पोस्ट केले. ट्रम्पने प्रत्युत्तर देत मस्क यांना “अशिष्ट” म्हटले पण नंतर एका रॅलीत त्यांना “स्मार्ट आणि अद्भुत माणूस” म्हटले.