“बस्स झालं..आता मी हे सहन करू शकत नाही” ; ट्रम्पच्या कर विधेयकावर एलॉन मस्क संतापले

Elon Musk on Donald Trump । अब्जाधीश उद्योगपती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाच्या नवीन कर आणि खर्च विधेयकावर तीव्र हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. याविषयी बोलताना एलॉन मस्क यांनी या विधेयकाला ‘खूपच घृणास्पद’ म्हटले आहे. तसेच या विधेयकामुळे देशात आणखी तूट वाढेल असा मोठा दावा देखील त्यांनी केला आहे.
यासोबतच, मस्क यांनी लिहिले की ‘माफ करा, पण मी ते आता सहन करू शकत नाही…’, हे काँग्रेसचे खर्चाने भरलेले, हास्यास्पद आणि लज्जास्पद विधेयक आहे. ज्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहित आहे की त्यांनी चूक केली आहे.” असे म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे.
२.५ ट्रिलियन डॉलर्सच्या तुटीचा इशारा Elon Musk on Donald Trump ।
मस्क यांनी इशारा देत हे विधेयक अमेरिकेची आधीच असणारी मोठी बजेट तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवेल, ज्यामुळे देशावरील अस्थिर कर्जाचा भार आणखी वाढेल असे म्हटले आहे.
मस्क ट्रम्पच्या टीमपासून वेगळे झाले
काही दिवसांपूर्वीच, एलॉन मस्क यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (DOGE) च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला, जो संघीय खर्च कमी करण्यासाठी जबाबदार होता. त्यांनी या वादग्रस्त विधेयकापासून स्पष्टपणे स्वतःला दूर ठेवले आहे.
ट्रम्प या विधेयकाच्या बाजूने उभे Elon Musk on Donald Trump ।
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी एलॉन मस्क यांच्या टीकेला हलके घेत,”अध्यक्ष ट्रम्प यांना या विधेयकाबद्दल एलॉन मस्क काय विचार करतात हे आधीच माहित होते, परंतु मस्कच्या या पावलामुळे त्यांचे (ट्रम्प) मत बदलणार नाही. हे एक मोठे सुंदर विधेयक आहे आणि राष्ट्रपती त्यावर ठाम आहेत” असे म्हटले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विधेयकाचे वर्णन त्यांच्या आर्थिक धोरणाचा कणा म्हणून केले आहे, तर मस्क हे अनियंत्रित खर्चाचे प्रतीक मानतात.
मस्क यांनी ट्रम्प यांना २५० दशलक्ष डॉलर्सची मदत दिली
२०२४ मध्ये ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेसाठी एलॉन मस्क यांनी २५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त देणगी दिली. त्यानंतर, त्यांनी ‘डेफिसिट ऑप्टिमायझेशन अँड गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE)’ नावाच्या उपक्रमाचे नेतृत्व देखील केले, परंतु आता ते बंद करण्यात आले आहे. त्याचा उद्देश सरकारी अपव्यय मुळापासून उखडून टाकणे हा होता.
राजकीय प्रतिसाद
केंटकी रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी यांनी एलॉन मस्क यांना पाठिंबा दिला आणि ते बरोबर असल्याचे सांगितले. प्रत्युत्तरात मस्क यांनी दोन शब्दांत उत्तर दिले – ‘सोपे गणित’.
मस्क यांना विधेयक समजत नाही : हाऊस स्पीकर जॉन्सन
मात्र, हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी मस्क यांच्या टीकेचे वर्णन अतिशय निराशाजनक केले. त्यांनी सांगितले की त्यांनी सोमवारी एलॉन मस्क यांच्याशी २० मिनिटे चर्चा केली आणि हे विधेयक मोठ्या प्रमाणात कर कपात आणि निवडणूक आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पहिले मजबूत पाऊल आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु एलॉन ते समजू शकत नाहीत.





