Elnaaz Norouzi : अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर ! बॉयफ्रेंडने जबरदस्ती केलं ब्रेकअप; प्रायव्हेट चॅट्स व्हायरल

Elnaaz Norouzi : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉरवर प्रदर्शित झालेली सेक्रेड गेम ही सिरीज चांगलीच गाजली होती. गणेश गायतोंडे, कुक्कु, जो जो, त्रिवेदी अशी अनेक पात्रे आजही सर्वांच्या लक्षात आहे. ‘एलनाज नोरौजी’ या परदेशी अभिनेत्रीने देखील या सिरीजमध्ये अभिनय केला होता. मूळची इराणमधील असलेली ही अभिनेत्री आता पुन्हा चर्चेत आली आहे.
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नुकताच तिने एका गुप्त संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय. या स्क्रीनशॉटमध्ये एलनाज एका अनामिक व्यक्तीसोबत चॅट करताना दिसते. हे चॅट्स अत्यंत खासगी आणि भावनिक असून, त्यातून एका नात्याचा शेवट स्पष्टपणे सूचित होतो.
“आपण हे नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले” असं एलनाजने लिहिलं आहे. तर समोरची व्यक्ती उत्तर देते, “माहितीय, पण असं वाटतंय की आपण फक्त वर्तुळात फिरतोय… आणि हे नातं कोणालाही आनंद देत नाही. म्हणजे इतकं सगळं झाल्यावरही तू हार मानतो आहेस?” असं विचारणारी एलनाज, शेवटी स्वतःच म्हणते, “कदाचित हे माझं मूर्ख मन आहे…” असं यामध्ये दिसून येत आहे.
View this post on Instagram
एलनाजने या व्यक्तीचं नाव जरी झाकलेलं असलं, तरी यूजर्सनी याचा संबंध हॉलिवूड अभिनेता जेरार्ड बटलर याच्याशी लावला आहे. काही काळापूर्वी एलनाज आणि जेरार्डचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघंही एकत्र सुट्टीचा आनंद घेताना दिसत होते. त्यामुळे याआधीपासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र, आता या इमोशनल पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की खरंच एलनाजचं ब्रेकअप झालंय का?
दरम्यान, अभिनेत्री एलनाज नौरोजी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. सेक्रेड गेम्समधील दमदार अभिनयानंतर एलनाज जास्त लोकप्रिय झाली. इंस्टाग्रामवर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, ती तिच्या बोल्ड अंदाजने फॅन्सला नेहमीच घायाळ करत असते.





