वाघोलीत गणेश नगर परिसरातील विजेचा प्रश्न सुटला; नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Updated On:

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील गणेश नगर परिसरातील अनेक सोसायटी मधील विजेचा लपंडाव थांबणार असून संदीप सातव यांच्या माध्यमातून नवीन ट्रांसफार्मर बसवून विजेचा प्रश्न महावितरणने सोडवला असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
या बाबतीत पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव यांनी सांगितले की गणेश नगर भागातील मदरमेरी, साईराज पार्क 1,2,3 ,समर्थ पार्क,आदर्श पार्क, इंकाई सोसायटी,गणराज पार्क या परिसरातील वारंवार लाईट जाणे, होल्टेज प्रॉब्लेम याबाबत नवीन ट्रांसफार्मर बसवण्यासाठी महावितरण कंपनीकडे अनेक वेळा पाठपुरावा करून नवीन 315 केव्ही चा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. यासाठी सहाय्यक अभियंता बाबर व ट्रांसफार्मर बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मारुती विठोबा सातव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.





