पुणे जिल्हा | युवक अध्यक्षपदी योगेश शितोळे यांची निवड

वाघोली, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ युवकच्या तालुका अध्यक्षपदी न्हावी सांडस (ता. हवेली) येथील माजी सरपंच योगेश बाळासाहेब शितोळे यांची निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांनी दिले आहे. पुण्यात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते शितोळे पत्र देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार सर्वसामान्य युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.
शितोळे यांच्या निवडीबद्दल प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष संदीप गोते, माजी सरपंच रामदास शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.





