पुणे : ‘द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन’ची निवडणूक जाहीर

पुणे – कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणेची वार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. २८ जून रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ३९८ जणांची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘वन बार, वन व्होट’ डिकलेरेशन सभासदांना द्यावे लागणार आहे. १५ जूनपर्यंत दुपारी १२ ते ३ या वेळेत हे डिक्लेरेशन स्विकारण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता अंतिम पारूप यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर १८ आणि १९ जून रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत हरकती घेता येणार आहेत. १९ जून रोजी दुपारी ४ वाजता अंतिम यादी जाहीर होणार आहे.
२० आणि २१ जून रोजी उमेदवारी अर्ज विक्री आणि अर्ज दाखल करता येणार आहेत. २२ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, २४ जून दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २४ जून रोजी दुपारी ४ वाजता अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. २८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ॲड. अमृता गुरव देशमुख या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.




