satara | महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सहसचिवपदी चंद्रकांत तोरणे यांची निवड

दहिवडी, (प्रतिनिधी) – टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 ची वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सातारा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिवचंद्रकांत तोरणे यांची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्ष म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव, मिनाक्षी गिरी उपस्थित होत्या. गतवर्षी त्यांनी कोल्हापूर विभाग सचिवपदी काम केले आहे. चंद्रकांत तोरणे हे क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल म्हसवड येथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, अध्यक्ष मयुरी गिरी, महिला डायरेक्टर धनश्री गिरी, खजिनदार सानपर, विलास गिरी, कोल्हापूर विभाग सचिव राजेंद्र बनसोडे, पुणे विभाग प्रमुख रामा रणदिवे, क्रीडा मार्गदर्शक विरभद्र कावडे, क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक विश्वंभर बाबर, मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य विनसेंट जॉन, समन्वयक अभिजीत सावंत, तुकाराम घाडगे, राहुल फुटाणे इत्यादींनी अभिनंदन केले.





