Election 2026 : अनेक भागात बोगस मतदारांचा सुळसुळाट !
Updated On:

Election 2026 : बोगस मतदानाची तक्रार आल्यानंतर त्यावर कारवाई करू असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी मुंबईतील विविध ठिकाणी मात्र बोगस मतदारांचा सुळसुळाट सुरू असल्याची माहीती आहे.
गोरेगावातही असाच प्रकार समोर आला आहे. मूळ मतदार मतदानासाठी गेल्यानंतर समजले की त्याच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केले आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मतदान प्रक्रियेत सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात दुसऱ्याच्या नावाने बोगस मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गोरेगाव आरे कॉलनी मयूर नगर परिसरात अली अन्सारी नावाच्या व्यक्तीच्या जागेवर दुसऱ्याने मतदान केलाची धक्कादायक घटना समोर आली आहे. अली अन्सारी जेव्हा मतदान करायला गेला तेव्हा, त्याच्या नावावर मतदान दुसऱ्यांनी केलाचे समोर आले.





