उंब्रज, (प्रतिनिधी) – चोरे, ता. कराड येथील श्रीमती ताराबाई आनंदराव यादव (वय 64) यांचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा प्रदीप यादव (वय 40, रा. चोरे, सध्या रा. गोकुळ शिरगाव, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. श्रीमती ताराबाई आनंदराव यादव ह्या चोरे येथील घरात एकट्या राहतात. त्यांचा अज्ञात कारणावरुन, हत्यार्याने डोक्यात मारून खून केला, असे प्रदीप यादव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.