बीडमध्ये घराला लागलेल्या आगीत वृद्धाचा मृत्यू
Updated On:

बीड – जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आलापूर येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले होते आणि त्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.
आलापूर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणी शहाणे हे दांपत्य गावात एका पत्राच्या शेडमध्ये राहत होते. रुक्मिणीबाई या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या तर अंध असलेले रामभाऊ हे आजारी असल्याने ते घरातच झोपून होते.
मात्र दुपारच्या वेळी अचानक त्यांच्या शेडमध्ये आग लागली आणि काही वेळातच आग एवढी पसरली की संपूर्ण घर आगेच्या भक्षस्थानी गेले. या आगीच्या घटनेत होरपळून रामभाऊ शहाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.





