Pankaja Munde : भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह ओबीसी नेते उपस्थित राहणार
Pankaja Munde : समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण

Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेल्या भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून, या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
या मेळाव्याला माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, ॲड. मंगेश ससाणे आणि नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकी कोणती भूमिका मांडणार, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर काय भाष्य करणार, तसेच आगामी राजकारणाच्या दृष्टीने कोणते संकेत देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकीकडे मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून, दुसरीकडे समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे भगवान भक्ती गडावरील या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या भाषणातून काय संदेश दिला जातो, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Crime News : कोंढापुरीत युवकाला धारदार शस्त्राने वार करून संपवलं






