Crime News : कोंढापुरीत युवकाला धारदार शस्त्राने वार करून संपवलं
Crime News : कोंढापुरी ता. शिरूर येथील खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या तळ्याजवळ आज २० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता त्यांना एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

शिक्रापूर : शिरूर तालुक्यात अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार व खुनांची मालिका सुरु असताना आता कोंढापुरी मध्ये युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली असून महेंद्र लहू सकट असे खून झालेले युवकाचे नाव आहे.
कोंढापुरी ता. शिरूर येथील खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या तळ्याजवळ आज २० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता त्यांना एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अनिषण विभागाचे अधिकारी कर्मचारी व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी पाहणी केली असता युवकाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याचे समोर आले. त्यावेळी सदर मृत युवकाचे नाव महेंद्र लहू सकट रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले, तर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांचा आदींनी भेटी देत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहस्य व विच्छेदन साठी पाठवून देत आरोपींचा शोध सुरू केला आहे. शिरूर तालुक्यात एका मागे एक घडणाऱ्या खुनाच्या घटनेमुळे शिरूर तालुका पूर्णतः हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





