Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र! दिग्गजांचा पत्ता कट, शिवसेनेकडून नवीन चेहऱ्याला राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत ज्योती वाघामारे?
Jyoti Waghmare : शिवसेनेकडून अखेरच्या दिवशी राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ज्योती वाघमारे या नवीन चेहऱ्याला राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे.

Jyoti Waghmare : आज ५ मार्च राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
मात्र, शिवसेना शिंदे पक्षाकडून राज्यसभेसाठी कोण उमेदवार असणार यासाठी मोठी चढाओढ निर्माण झाली होती. अखेर सस्पेन्स संपला असून, राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. यामुळे अनेकांनी लावलेली अंदाज फोल ठरवत शिंदेंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
राज्यसभेच्या उमेदवारांच्या रेसमध्ये अनेक नेत्यांची नावे आघाडीवर होती. पण एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे या आक्रमक चेहऱ्याला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. एका महिला नेत्याला राज्यसभेची उमेदवारी दिल्याने शिंदेंच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांची नावे आघाडीवर मानली जात होती. अखेर पक्षाने ज्येष्ठांना डावलत ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare ) यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे नव्या नेतृत्वाला वाव देण्याचा संदेश दिला गेल्याचे बोलले जात आहे.
२०२३ मध्ये ज्योती वाघमारे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या प्रखर वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. सोशल मीडियावर त्या उद्धव ठाकरे गट, सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्या सतत चर्चेत असतात.
कोण आहेत ज्योती वाघमारे? Jyoti Waghmare
ज्योती वाघमारे पेशाने प्राध्यापक PhD धारक आहेत. त्यांची पार्श्वभूमीवर पाहता सोलापूरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. त्या मोची समजातून येतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरीब कुटुंबाची आहे. तेलगू, इंग्रजी भाषेत पीएचडी त्यांनी केली असून मराठीवर प्रभुत्व असल्याने ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता ठरतात.

Jyoti Waghmare
गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काम केले आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पँथरचे कार्यकर्ते होते.
२०१४ मध्ये ज्योती वाघमारे यांनी सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याने महिला नेतृत्वाची मोठी पोकळी भरून निघाली. त्यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता म्हणून जबाबदारी असून, धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे.





