Priyanka Chopra : सरोगसीच्या निर्णयामुळे प्रियांका चोप्राला केलं ट्रोल; ‘त्या’मागचं कारणं सांगत टीका करणाऱ्यांना सुनावलं
Priyanka Chopra : प्रियंकाच्या लेकीचं नाव मालती आहे. प्रियांका अनेकदा मालतीबरोबरचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही मोठे यश मिळवले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर ती वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रियांकाने २०१८ मध्ये गायक निक जोनासशी लग्न केले. त्यानंतर तिने सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची बातमी शेअर केली होती.
सरोगसीच्या मदतीनं आई झाल्यानंतर प्रियांकावर अनेकांनी टीका केली. त्याबद्दल एका मुलाखतीत प्रियांकानं सरोगसीचा निर्णय घेण्यामागचे कारण देत सांगितले की, “मला काही वैद्यकीय अडचणी होत्या आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. मला आनंद आहे की, मला हा पर्याय उपलब्ध होता.”
तर टीका करणाऱ्यांना उत्तर देत, “मी काय सहन केलं आहे, ते ट्रोल करणाऱ्यांना माहीत नाही. मी माझ्या किंवा माझ्या मुलीच्या वैद्यकीय परिस्थितीबद्दल कुणालाही सार्वजनिकपणे सांगू शकत नाही,” असे प्रियंकाने सांगितले.
तर लेकीच्या जन्माच्यावेळच्या कठीण दिवसांबाबत सांगताना प्रियांका म्हणाली, “२७ आठवड्यांतच ती जन्माला आली होती आणि १०० दिवसांपेक्षा जास्त काळ एनआयसीयू मध्ये राहिली. ती खूपच लहान होती, अगदी माझ्या हातापेक्षाही लहान होती. त्यावेळी ती वाचेल की नाही, याचीही आम्हाला खात्री नव्हती.
माझ्या लेकीचा जन्म हा माझ्यासाठी एक चमत्कारच आहे. तिचा जन्म झाल्यानंतर मला माझं सगळं आयुष्य थांबल्यासारखं वाटलं. मला अजूनही सतत भीती वाटत राहते.” Priyanka Chopra
दरम्यान, प्रियंकाच्या लेकीचं नाव मालती आहे. प्रियांका अनेकदा मालतीबरोबरचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अनेकदा मालतीला शूटिंगच्या सेटवरही घेऊन जाते असे.
प्रियांका लवकरच ‘वाराणसी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. हा चित्रपट एप्रिल २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. Priyanka Chopra
हेही वाचा:






