एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल

Eknath Shinde | राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या 5 नोव्हेंबरला पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. असे असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा आला असल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली असता ते रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गावी गेल्यानंतर त्यांची प्रकृती तिथे खालावली होती. पण दोन दिवसांनी तेथे विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा ठाण्यात परतले होते. यादरम्यान पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली. त्यांचा घसा दुखत असल्याने तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याने त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. सतत अँटी बायोटीक दिल्याने अशक्तपणा आल्याने देखील उपचार करावे लागणार असल्याने एकनाथ शिंदे ज्युपिटरमध्ये दाखल झाले आहेत. येथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार आहेत.
शपथविधीची जोरदार तयारी सुरु
दरम्यान, 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मु या बैठकीत ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला.
गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच
दुसरीकडे, गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप गृहखातं सोडायला तयार नाही आहे. तर शिवसेना गृहखात्यासाठी ठाम आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील गृहखात्यावरून वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर गृहमंत्रिपद आम्हाला पाहिजे असं सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. त्यामुळे आता गृहमंत्री पदाबाबत काय निर्णय घ्यावा लागणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
“शिवसेनेइतकीच मंत्रीपदं आम्हाला मिळावी” ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मागणीने महायुतीत नवा पेच





