Eknath Shinde : एकनाथ शिंदे ‘उपमुख्यमंत्री पद’ घेऊन सरकार मध्ये सहभागी होतील; वाचा ‘हे’ ५ कारण…

Eknath Shinde : महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच राज्यात निकाल लागून आता आठ दिवस होत आहेत. मात्र राज्यात अजूनही सरकार स्थापन झाले नाही त्यामुळे महायुतीमध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत चर्चाच सुरु असल्याचे दिसून येत आहे.
तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. जर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले तर काय होईल? यावर एक नजर टाकुयात….
एकनाथ शिंदे सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पद घेऊन सहभागी होतील, कारण…
१. संघटन टिकवायचे असेल तर सत्तेत सहभागी व्हावं लागेल.
२. येत्या महापालिका, ZP निवडणूका लढण्यासाठी सरकार मध्ये रहावं लागेल.
३. पद नसेल तर संघटनेतील पदाधिकारी आणि आमदार खासदार शिवसेनेतून बाहेर पडण्याची भिती. उद्धव ठाकरेंना पुन्हा उभारी मिळेल.
४. सत्तेत असताना जे निर्णय घेतले, त्याचं क्रेडिट घेता येणार नाही.
५. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांचा आग्रह टाळता येणार नाही.





