Eknath Shinde : एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीसाठी; घडामोडींना वेग, काही वेळातच..
"शिवसेना कोणाची, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनंच दिलंय!" असा टोला विरोधकांना लगावला. 60 आमदार निवडून देऊन जनतेने निकाल दिला आहे.

Eknath Shinde : शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मूळ अस्तित्वावरून सुरू असलेल्या बहुचर्चित वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली.
ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर जोरदार बाजू मांडत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
त्यांच्या युक्तिवादात विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षातील फरक, पक्षघटना, अपात्रतेची कारवाई आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर भर देण्यात आला.
दरम्यान, सुनावणीच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील अंतिम निर्णय भविष्यासाठी लागू राहील, असे स्पष्ट केले. आता पुढील आठवड्यात शिंदे गटाकडून प्रतियुक्तिवाद होणार असल्याने या प्रकरणाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “शिवसेना कोणाची, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनंच दिलंय!” असा टोला विरोधकांना लगावला. 60 आमदार निवडून देऊन जनतेने निकाल दिला आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आणि लोकशाहीतील बहुमतावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर एकनाथ शिंदे तातडीनं सातारा दौरा आटोपून दरे गावातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिंदे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अचानक दौरा आटपून गेल्याची सूत्रांची माहिती आहे.






