Baramati News : दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंबाला खास भेट! एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंकडून ‘आई पर्यटन योजने’तून टोयोटा रुमियन
Baramati News : दिवाळी सणाचे औचित्य साधत बारामती तालुक्यातील एका महिला उद्योजिकेच्या आयुष्यात आनंदाचा नवा प्रकाश पडला आहे.

Baramati News : दिवाळीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने बारामती तालुक्यातील पवार कुटुंबाला ‘आई पर्यटन योजने’अंतर्गत टोयोटा रुमियन हे चारचाकी वाहन भेट देण्यात आले. ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी या वाहनाचे वितरण करण्यात आले. (Baramati News)
बारामती तालुक्यातील मोरगाव परिसरातील तरडोली येथील पवारवाडीच्या रहिवासी सौ. प्रियांका महेंद्र पवार या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पर्यटन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. (Baramati News)
बारामती येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रजी जेवरे व त्यांचे सर्व सहकारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविण्याचे काम सुरू आहे. (Baramati News)
लाभार्थी महिलेची माहिती :
नाव : सौ. प्रियांका महेंद्र पवार
गाव : पवारवाडी, तरडोली
तालुका : बारामती
वाहन : टोयोटा रुमियन





