Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis : मोठी बातमी ! एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून शिवसेनेचे (Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis) नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच, शिंदे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून शिवसेनेचे (Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis) नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच, शिंदे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थान (Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis) असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. या भेटीचा नेमका उद्देश आणि चर्चेचे मुद्दे काय आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणामुळे सातत्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. नाशिक येथील या भोंदूबाबा प्रकरणात अनेक राजकीय नेते, व्हीआयपी आणि उच्चपदस्थ व्यक्ती अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
दरम्यान, खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यावरही आरोप झाले होते. केसरकर यांनी माध्यमांना दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की, “३९ आमदार भेटले असताना माझेच नाव का घेतले जाते?” या विधानामुळे आता ते ३९ आमदार कोण आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या विधानाने एकनाथ शिंदे नाराज झाल्याचीही चर्चा रंगली होती.
याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीत नेमके कोणते मुद्दे चर्चिले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीत भोंदू अशोक खरात प्रकरण, दीपक केसरकर यांचे विधान, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील सध्याची राजकीय स्थिती यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये (भाजप-शिंदे शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार गट) सध्या एकमेकांवर (Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis) अप्रत्यक्ष कुरघोडी आणि अंतर्गत तणावाची चर्चा रंगत असताना, शिंदे-फडणवीस यांच्या या अचानक आणि महत्त्वपूर्ण भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.






