Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई ! ‘या’ पदाधिकाऱ्याचे केले निलंबन
एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी, शिवसेनेचे पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांना निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी केली.

Eknath Shinde : एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी, शिवसेनेचे पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांना निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी केली.
पणजी येथे झालेल्या २८ व्या पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, शिंदे यांनी स्पष्ट केले की, डॉक्टर किंवा इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराचे समर्थन त्यांचा पक्ष करणार नाही. पालघरमधील (Eknath Shinde) घटना अत्यंत दुर्दैवी आहे. डॉक्टर किंवा रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये, जखमी गोविंदांच्या वैद्यकीय बिलांवरून झालेल्या वादामुळे, रविवारी पहाटे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, त्यांना शिवीगाळ केली आणि धमकावले. त्यानंतर शिवसेनेचे पालघर जिल्हा आणि शहर प्रमुख तसेच एका आमदाराच्या मुलासह अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हा दाखल झालेल्या १७ जणांपैकी १० जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिंदे म्हणाले, जर रुग्णाच्या बिलांबाबत काही अनियमितता असेल, तर स्वतःच्या हाताने कायदा हातात घेण्याऐवजी कायदेशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती. शिवसेना अशा वर्तनाचे समर्थन करणार नाही. डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिकांवरील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला.






