Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे, असे सांगत शिंदे यांनी आवाहन केले. एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील कागलमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावे लागते. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही प्रचार साधेपणाने करतो. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतो. तसेच, कोल्हापूरच्या मातीला एक वेगळा सुगंध आहे. संजय मंडलिक तुम्ही एकटे नाहीत, ही जनता तुमच्या सोबत आहे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आली आहेत. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे आणि या लढाईत नेहमी जनशक्ती जिंकते. सत्तेसाठी एकत्र आला असला तरी जनता ठरवते कुणाला मत द्यायचे. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे, असे सांगत शिंदे यांनी आवाहन केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही पक्षाचा पाया रचणारी निवडणूक आहे. मी आज नेहमी सारखे भाषण करणार नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रचाराला आलो आहे. नगरपरिषद आणि महानगरपालिका पालिका निवडणुकीत शिवसेना राज्यात दुसऱ्या नंबरचा पक्ष राहिला आहे. Ladki Bahin Yojana कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 5 आमदार आहेत आणि एक खासदार आहे. संजय मंडलिक गेल्या वेळी थोडक्यात सुटले, पुढच्या वेळी नक्की बरोबर पकडतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.