Eknath Shinde : एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये! आमदार खासदारांवर सोपवली विशेष जबाबदारी; अचानक निर्णयामागचे कारण काय?
Eknath Shinde : शिवसेना पक्षाकडून लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका संपल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाला कुठे जीत कर कुठे हार पत्करावी लागली.
स्थानिक निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आगामी निवडणुकांसाठी त्यांनी कंबर कसली असून, पक्षाच्या संघटन स्थानिक पातळीवर आणखी वाढवण्यासाठी आमदार खासदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पक्षाच्या वतीने नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यातील विविध विभागांची जबाबदारी अनुभवी नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे. या नियुक्त्या जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
शिवसेना विभागीय संपर्कप्रमुख Eknath Shinde
दक्षिण कोकण – (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग): किरण सामंत
उत्तर कोकण – (रायगड आणि पालघर): भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्र – (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर): दगडू दादा सकपाळ
मराठवाडा – (धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड): प्रकाश आबिटकर
पूर्व विदर्भ – (नागपूर, भंडारा आणि गोंदिया): डॉ. दीपक सावंत
पूर्व विदर्भ – २ (वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली): डॉ. मनीषा कायंदे
पश्चिम विदर्भ – (अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा): संजय राठोड
शिवसेना विभागीय सह संपर्कप्रमुख
उत्तर कोकण – (रायगड आणि पालघर): प्रदीप (भाई) खाडे
पश्चिम महाराष्ट्र – (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर): हनुमंत जगदाळे
पश्चिम विदर्भ – (अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा): पराग पिंगळे
उदिष्ट काय? Eknath Shinde
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची पकड अधिक घट्ट करणे.
सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे.
संघटनात्मक बांधणी करणे.
तूर्तास ग्रीन सिंग्नल नाही Eknath Shinde
शिंदेसेनेकडून तुतारीचे 6 आणि उबाठाचे 6 असे एकूण 12 खासदार फोडण्याची रणनीती आखली होती, अशी चर्चा आहे. या योजनेनुसार शिंदेंकडे एकूण 19 खासदारांचे संख्याबळ निर्माण करून राज्यातील बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न होता. तसेच 2029 च्या निवडणुकीत किमान 19 जागांवर दावा करण्याचा विचार होता. मात्र, या रणनीतीला भाजपकडून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.





