Eknath Shinde । ‘मी करेक्ट कार्यक्रम करतो…’ एकनाथ शिंदेंच्या विधानावर विजय वडेट्टीवार म्हणाले…

Eknath Shinde: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरूवात झाली. यावेळी मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र सोशल मीडियावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी लिमीटच्या बाहेर गेलं की ,आपण कार्यक्रम करतो असं विधान करताना दिसतात. ते मनोज जरांगे यांच्या बाबत बोल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार यांची सोशल मीडिया पोस्ट
मुख्यमंत्री कोणाचा कार्यक्रम करतात हे माहित नाही.
मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करेल हे नक्की!— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 27, 2024
हेही वाचा
Manoj Jarange Patil । ‘मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा’ भाजपच्या बड्या नेत्याची मागणी




