Eknath Shinde: दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार; विशेष विमानाची केली व्यवस्था
Eknath Shinde: फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार आहेत.

Eknath Shinde: इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढला आहे. इराणने अमेरिकेचा बदला घेण्यासाठी ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली.
अमेरिका इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा पूर्णपणे बंद आहे. यादरम्यान, दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
१६४ प्रवासी मुंबईत दाखल होणार ( Eknath Shinde)
फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार आहेत. ही विमानं आज संध्याकाळी भारतात येणार असून यामधून १६४ प्रवासी मुंबईत दाखल होणार आहे. त्यानुसार आज दुपारी फुजैरा विमानतळ येथून स्टार एअरची दोन विशेष विमाने मुंबईकडे उड्डाण करणार आहेत.
यामध्ये व्हीटी-जीएसओ –दुपारी ३.३० वाजता एक उड्डाण तर व्हीटी-जीएसएच – दुपारी ४.३० वाजता उड्डाण करणार आहे. या
दोन्ही विमानांद्वारे एकूण १६४ प्रवासी संध्याकाळी ५.३० ते ७.०० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल होतील.
या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आणि इतर भागांतील नागरिकांचा समावेश आहे.
Shankar Mahadevan Birthday: इंजिनिअर ते संगीतसम्राट… शंकर महादेवन यांचा ‘ब्रेथलेस’ प्रवास
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला होता. “काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी आश्वासन दिले होते. Eknath Shinde
हेही वाचा:






