Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो? कोणी केला दावा

Eknath Shinde On Sham Manav : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात जादूटोणा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरले आहेत, असं खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, वर्षा बंगल्यात जादूटोण्याचा प्रकार झाला असल्यास एकनाथ शिंदे यांना सहा महिने ते ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो, असं मोठं विधान प्राध्यापक श्याम मानव यांनी केलं आहे.
काय म्हणाले प्राध्यापक श्याम मानव?
प्राध्यापक श्याम मानव म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहा महिने ते सात वर्षांचा कारावास होऊ शकतो. पुरोगामी महाराष्ट्राने अंद्धश्रदा विरोधात कायदा दिला. त्याच राज्यात राजकारणी घाबरतात, असे श्याम मानव म्हणाले आहेत. पुढे म्हणाले, राज्यात जादूटोणा कायदा असून कायद्याच्या विरूद्ध किंवा त्याचा कोणी उल्लंघन करीत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. लोकांमध्ये हिम्मत वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे, असंही प्राध्यापक श्याम मानव म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरले. त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत. आजचं सरकारच स्वतः अंद्धश्रदा आहे. अंधश्रद्धाचं समर्थन करतात. अंद्धश्रदा पसरविण्यात त्याचा वाटा आहे, असेही श्याम मानव यावेळी म्हणाले.
वर्षा बंगल्यावर रेड्याची मंतरलेली शिंगे पुरली : संजय राऊतांचा दावा
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? हा ‘मारूती कांबळेचं काय झाले’, यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके दिवस झाले त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन. पण मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षावर अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत? असा सवाल संजय राऊतांनी केला.
पुढे म्हणाले, मी असं ऐकलंय की देवेंद्र फडणवीस म्हणाले राहायला गेलो तरी मी वर्षा बंगल्यावर झोपायला जाणार नाही. हा काय प्रकार? आख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली आहे. शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी त्याचं उत्तर द्यावं. भाजपाच्या अंत:स्थ गोटात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्य देवी मंदिरात कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली आहेत. जेणेकरून दुसऱ्या कुणाकडे मुख्यमंत्रीपद टिकू नये. अशी चर्चा आहे. त्यांचेच लोक सांगत आहेत. तिथला कर्मचारीवर्ग सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे माहिती नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.





