WTC Final 2025 : आरसीबी-दक्षिण आफ्रिकेसह ‘या’ ८ संघांनी २०२५ मध्ये रचला इतिहास, संपवला ट्रॉफीचा दुष्काळ

WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत करून एक नवा इतिहास रचला आहे. अवघ्या ११ दिवसांपूर्वी आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघानेही ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला होता. केवळ या दोन संघांनीच नव्हे, तर २०२५ मध्ये एकूण ८ संघांनी त्यांचा दीर्घ प्रतीक्षा कालावधी संपवला आहे. या ८ संघांमध्ये विविध खेळांचे संघ समाविष्ट आहेत.
टेम्बा बावुमा आणि रजत पाटीदारने रचला इतिहास –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (आरसीबी) संघ आयपीएल २००८ मध्ये सुरू झाल्यापासून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत होता. अखेर १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विराट कोहलीच्या संघाने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यापूर्वी बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरीकेन्स संघाने १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ट्रॉफी जिंकली होती.
🚨 2025 IS THE YEAR OF NEW CHAMPIONS 🚨
– Hobart Hurricanes won BBL after 13 Years.
– Tottenham Hotspurs won Europa Cup after 17 Years.
– Bologna FC won Coppa Italia after 51 Years.
– Newcastle won Carabao Cup after 70 years.
Crystal palace won FA Cup after 119 Years.
Paris… pic.twitter.com/FgoEaKk6mq— Tanuj (@ImTanujSingh) June 14, 2025
याशिवाय, फुटबॉलमधील काही संघांनीही आपली ट्रॉफीची प्रतीक्षा संपवली, ज्यामध्ये पॅरिस सेंट जर्मेनचा समावेश आहे, ज्यांनी प्रथमच चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली. आता दक्षिण आफ्रिका संघानेही २७ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. या सर्व संघांना यापूर्वी ‘चोकर्स’चा टॅग लागला होता, जो आता त्यांनी पुसून टाकला आहे. २०२५ हे वर्ष नव्या विजेत्यांच्या नावाने नोंदवले गेले आहे.
२०२५ मध्ये नवीन चॅम्पियन बनलेल्या संघांची यादी :
- होबार्ट हरीकेन्स – १३ वर्षांनंतर बिग बॅश लीग (BBL) जिंकली.
- टॉटेनहॅम हॉटस्पर – १७ वर्षांनंतर युरोपा कप जिंकला.
- बोलोग्ना एफसी – ५१ वर्षांनंतर कोपा इटालिया जिंकला.
- न्यूकॅसल युनायटेड – ७० वर्षांनंतर कॅराबाओ कप जिंकला.
- क्रिस्टल पॅलेस – ११९ वर्षांनंतर एफए कप जिंकला.
- पॅरिस सेंट जर्मेन (PSG) – इतिहासात प्रथमच चॅम्पियन्स लीग जिंकली.
- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) – १८ वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली.
- दक्षिण आफ्रिका – २७ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.





