गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग; कुटुंबातील आठ जण होरपळले

आग्रा येथील शाहगंज पोलीस स्टेशन हद्दीतील भोगीपुरा येथील वाल्मिकी वस्तीमध्ये सोमवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील आठ जण होरपळ आहेत. हा अपघात सकाळी 8.15 च्या सुमारास झाला. वाल्मिकी वस्ती येथील रहिवासी विनोद यांच्या घरात अचानक सिलिंडरने पेट घेतला. आगीमुळे कुटुंबात एकच गोंधळ उडाला.
या आगीमध्ये विनोद, त्याची पत्नी कमलेश, मुलगा, भाची यांच्यासह आठ जण भाजले गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी सर्वांना बाहेर काढले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराचेही नुकसान झाले असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे.
या घटनेत जखमी झालेल्यांना एसएन मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सांगितले आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.





