Mumbai Gas Cylinder Blast – मालाड (पश्चिम) येथील मालवणी परिसरातील भारत माता शाळेजवळ असलेल्या एका चाळीत मंगळवारी सकाळी ९.२५ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट (Mumbai Gas Cylinder Blast ) झाल्याने एक लहान मूल आणि इतर सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये जखमी झालेल्या दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग लागली, ज्यामुळे दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील अनेक घरगुती वस्तू आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी रोमा (३५) आणि अलीशा (१८) या दोघी सुमारे ३५ टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. Malad Cylinder Blast जुलेखाबानो अफताब अन्सारी (६०) आणि २ वर्षांच्या आदिल शेख यांना पालिकेच्या कूपर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर तीन व्यक्ती – विजय चौधरी (५४), तुआसिब खान (१८) आणि अली कासम (१७) – यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.