Egypt Historical Win : इजिप्तचा ऐतिहासिक विजय! मोहमद सालाहच्या जोरावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाला चारली धूळ
Egypt Historical Win : 'राउंड ऑफ ३२' मधील अत्यंत चुरशीच्या सामन्यात इजिप्तने ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव करत विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिलावहिला विजय नोंदवला.

Egypt vs Australia FIFA World Cup 2026 Penalty Shootout Mohamed Salah : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत आफ्रिकन देश इजिप्तने एक नवा इतिहास रचला आहे. ‘राउंड ऑफ ३२’ मधील अत्यंत चुरशीच्या सामन्यात इजिप्तने ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव करत विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिलावहिला विजय नोंदवला. निर्धारित ९० मिनिटे आणि अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते, ज्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लावण्यात आला. या ऐतिहासिक विजयानंतर आता ‘राउंड ऑफ १६’ मध्ये इजिप्तचा सामना थेट गतविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे.
स्वतःच्याच डिफेंडरच्या चुकीमुळे वाढले दडपण –
सामन्याच्या १३ व्या मिनिटालाच इमाम आशूरने शानदार हेडरद्वारे गोल करून इजिप्तला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. मात्र, ५५ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी साधली. हा गोल ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने नाही, तर इजिप्तचा डिफेंडर मोहम्मद हानी याच्या चुकीमुळे झाला. ऑस्ट्रेलियाच्या एडेन ओ’नीलच्या फ्री-किकचा बचाव करताना हानीने चेंडू स्वतःच्याच गोलपोस्टमध्ये ढकलला आणि तो ‘ओन-गोल’ (Own Goal) ठरला. यामुळे सामना अतिरिक्त वेळेत आणि नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
🏆 FIFA World Cup 2026 (#88)
🗓️ July 3rd, 2026
📍Dallas Stadium🇦🇺 Australia – 1
⚽ 55′ ― Mohamed Hany (OG)🇪🇬 Egypt – 1
⚽ 13′ ― Emam Ashour🥅 PENALTY SHOOTOUT
🇦🇺 Australia – 2
🇪🇬 Egypt – 4🏅 Mo Salah, Man of the Match for Egypt vs Australia! 🇪🇬 pic.twitter.com/zJD3X7eADP
— ꜱᴘᴏʀᴛꜱ ᴡᴏʀʟᴅ 🌎 (@_mkverma) July 4, 2026
मोहम्मद सालाहची कमाल अन् ऑस्ट्रेलियाचा फ्लॉप शो –
पेनल्टी शूटआऊटमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद सालाहसह (Mohamed Salah) महमूद साबेर आणि रामी राबिया यांनी पहिले तीन गोल केले. त्यानंतर होसाम अब्देलमजीदने विजयी गोल डागत इजिप्तच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. हॅरी सुटरचा पहिलाच शॉट हवेत गेला, तर १८ वर्षीय लुकास हेरिंगटनचा शॉट गोलपोस्टला धडकून बाहेर गेला. ऑस्ट्रेलियाने केवळ शूटआऊटसाठी अनुभवी गोलरक्षक मॅथ्यू रॅयनला मैदानात उतरवले होते, मात्र तो इजिप्तचा एकही शॉट रोखू शकला नाही. या पराभवासोबतच विश्वचषक बाद फेरीतील ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड आता ०-३ असा झाला असून ते सलग तिसऱ्यांदा नॉकआऊट मॅच हरले आहेत.





