राजगुरुनगर: भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून गावागावातील तरुणांचे संघटन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खेड तालुका भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिले. ते भोरगिरी (ता. खेड) येथे संघटनेच्या नव्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. खेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील भोरगिरी येथे भीमशक्ती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक ऋषिकेश डोळस, भोरगिरीच्या माजी सरपंच निर्मला सोनवणे, कविता शिंदे, सविता खरात, भीमशक्ती संघटनेचे खेड तालुका कार्याध्यक्ष विलास रोकडे, उपाध्यक्ष एकनाथ रोकडे, पश्चिम विभाग अध्यक्ष दिलीप सोनवणे, पश्चिम विभाग कार्याध्यक्ष बट्टू शिंदे, सुभाष शिंदे, पश्चिम विभाग उपाध्यक्ष पोपट शिंदे, संदीप शिंदे, योगेश शिंदे, नितीन रोकडे, काळुराम थोरात, सिद्ध सरोदे, मंगेश जाधव, मंगेश शिंदे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल जाधव म्हणाले की, गावागावात जातीय सलोखा राखण्यासाठी आणि ग्रामविकासाच्या योजना दलित वस्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव तिथे भीमशक्ती या संकल्पनेतून शाखा सुरू करण्यात येत आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चौकट ः भोरगिरी शाखेची नवी कार्यकारिणी कांताराम सोनवणे – शाखा प्रमुख, विलास सोनवणे – शाखा अध्यक्ष, अक्षय सोनवणे – उपाध्यक्ष, प्रमोद सोनवणे – कार्याध्यक्ष, अंकुश सोनवणे – सचिव, गोविंद सोनवणे – सहसचिव, अमोल खरात – सहकार्याध्यक्ष, शक्ती सोनवणे – हिशोब तपासणीस, आनंद सोनवणे – सहहिशोब तपासणीस, प्रकाश सोनवणे – खजिनदार, सागर सोनवणे – सहखजिनदार, सुरेश सोनवणे – मार्गदर्शक. भोरगिरी ः येथे भीमशक्ती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करताना माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, तालुका अध्यक्ष अनिल जाधव व अन्य मान्यवर.