#IPL2021 : खेळाडूंना परत आणण्यासाठी प्रयत्नशील – क्रिकेट ऑस्ट्रेलिया
Updated On:

मेलबर्न – भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदीतून कोणतीही सूट मिळणार नाही. परंतु आयपीएल रद्द झाल्याने खेळाडू सुरक्षितपणे परत मायदेशी आणण्यासाठी बीसीसीआयशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दिली.
सीए आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सुरक्षित परतीची खात्री आणि त्यांच्या पाठिंब्यासंबंधी योजना आखण्यात येईल.
ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक, सामनाधिकारी व कमेंटर्स यांना ऑस्ट्रेलियात परत मायदेशी आणण्यासाठी थेट बीसीसीआयशी संपर्क साधला जात आहे. तसेच आयपीएलमधील सर्वांची सुरक्षित स्वदेशी परतण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सीए आणि एसीएने बीसीसीआयचे आभार मानले.





