Eetha Release Date : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल
Eetha Release Date : प्रेक्षकांना करावी लागणार प्रतिक्षा

Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर लावणी सम्राज्ञी आणि लोककलावंत स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ या बायोपिक सिनेमात मुख्यभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील श्रद्धाच्या लुकला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे.
टीझर पाहताच, हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. मात्र काही दिवसांपासून या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल होणार असल्याची चर्चा होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाली असल्याची माहिती दिली.
हा सिनेमा आता 28 ऑगस्ट 2026 रोजी नसून, 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे. Maddockfilmsने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला ‘तुफान के लिए तयार रहना, क्योंकि ईठा आ रही हैं.. 4 डिसेंबर को,’ असे कॅप्शनही देण्यात आले आहे. त्यामुळे आता ‘ईठा’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात श्रद्धा कपूर इतर कलाकारांचीही फौज पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर व्यतिरिक्त रणदीप हुड्डा, नाना पाटेकर आणि सिद्धार्थ जाधव यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे, साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ या सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 26 ऑगस्ट 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर 28 ऑगस्ट 2026 रोजी ‘ईठा’ हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र आता या सिनेमाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज लावणी सम्राज्ञी होत्या. महाराष्ट्राच्या लोककलेत, विशेषतः तमाशा आणि लावणी क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांना ‘तमाशा सम्राज्ञी’ ही पदवी बहाल करण्यात आली होती.
हेही वाचा:






