“ईडी”ची कारवाई सूडबुद्धीने; कॉंग्रेस संजय राऊत यांच्या पाठीशी

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचे पथक रविवारी त्यांच्या घरी दाखल झाले आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत कोणत्याही घोटाळ्याशी आपला काडीमात्र संबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर, विरोधकांनी कारवाईचे समर्थन केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने मात्र संजय राऊत यांच्या पाठीशी असल्याचं सांगत ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचे म्हटले आहे. तसेच, राऊतांना पाठींबा दिला आहे.
राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर विचारताच अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, “संजय राऊत यांच्या घरावर पोहोचलेली ED लोकशाहीच्या विदारक अवस्थेचे चित्र दर्शवत आहे. भाजपला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे. ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र आहे. भाजपत गेल्यावर या अस्त्रापासून संरक्षण मिळते. आम्ही संजय राऊत यांच्या पाठीशी उभे आहोत. जनतेचा लढा आहे, लढत राहू”, असं ते म्हणाले.






