Edin Rose : ‘मी त्याच्या मुलांची आई….’, श्रेयस अय्यरबद्दल ‘या’ अभिनेत्री केलं खळबळजनक वक्तव्य, पाहा VIDEO

Edin Rose bold statement on Shreyas Iyer : आयपीएल २०२५ मध्ये, पंजाब किंग्जने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली शानदार कामगिरी करत ११ वर्षांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. शेवटच्या क्षणी संघाला ट्रॉफी जिंकता आली नाही तरी श्रेयस अय्यरने आपल्या शानदार नेतृत्त्वानी चाहत्यांची मने जिंकण्यात यश मिळवले. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल एडिन रोजचे नावही जोडले गेले आहे. रोजने अय्यरबद्दल एक मोठे विधान केले आहे. तिने म्हटले आहे की, ती या खेळाडूला तिच्या मनात तिचा पती मानते आणि स्वतःला त्याच्या मुलांची आई मानते.
एडिन रोजने सांगितली श्रेयस अय्यरच्या गुणांची यादी –
एडिन रोजने फिल्मी ग्यानला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की तिला श्रेयस अय्यर खूप आवडतो आणि ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे. यासोबतच रोजने सांगितले की ती स्वतःला अय्यरच्या मुलांची आई देखील मानते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
View this post on Instagram
मुलाखतीदरम्यान रोजने अय्यरच्या चार मोठ्या खासियतांबद्दल सांगितलं. तिच्या मते, अय्यर उंच आणि रुबाबदार आहे. दुसरं म्हणजे तो देखणा आहे. त्यांची दाढीही छान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तो आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करतो. अय्यरचे माझ्या वडिलांप्रमाणे दक्षिण भारताशी खास नातं आहे. मला वाटतं, मी त्यांच्या मुलांची आई आहे आणि माझ्या मते, मी त्याच्याशी लग्न केलं आहे.
अंतिम सामन्यात पंजाबचा आरसीबीकडून पराभव झाला –
आयपीएल २०२५ मध्ये ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पंजाब संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला होता. अंतिम सामन्यात पंजाबला आरसीबीकडून ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. आयपीएलमध्ये तीन संघांना अंतिम फेरीत पोहोचवण्यात यशस्वी झालेला अय्यर हा एकमेव कर्णधार आहे. पंजाबपूर्वी अय्यरने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनाही त्याच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत नेले होते. गेल्या वर्षी अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने ट्रॉफी जिंकली होती.





