एड शीरन आणि शिल्पा रावचा व्हिडीओ व्हायरल; ‘देवरा’ सिनेमातील गाणं गात वेधलं साऱ्यांचे लक्ष

Ed Sheeran And Shilpa Rao Viral Video | हॉलीवूड गायक एडवर्ड क्रिस्टोफर शीरन सध्या भारत दौऱ्यावर असून त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान सोशल मीडियावर एडवर्ड क्रिस्टोफर शीरन आणि गायिका शिल्पा रावचा कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
बंगळुरूमध्ये 9 फेब्रुवारी रविवारी एड शीरनचा बंगळुरूमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टमध्ये त्याची साथ देण्यासाठी शिल्पा राव पोहोचली होती. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एड शीरनने चक्क शिल्पा रावबरोबर तेलुगू गाणं गायलं, जे ऐकून उपस्थित श्रोते हैराण झाले. यावेळी दोघांनी ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटातील ‘चुट्टमल्ले’ गाणं गायले.
एड शेवरन हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरने देखील एड शीरनचा व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
एड शीरनने शिल्पा रावबरोबरचा या परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “गेल्या काही दिवसांपासून शिल्पा रावच्या आवाजाचा चाहता झालो आहे. आज तिच्याबरोबर प्रत्यक्षात परफॉर्मन्स करणं आणि एक नवीन भाषा शिकणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.” याआधी चेन्नईच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एड शीरनने प्रसिद्ध ए.आर. रेहमान यांच्याबरोबर परफॉर्मन्स केला होता.
हेही वाचा:
टायगर श्रॉफने अनोख्या अंदाजात दिला संदेश; I LOVE YOU म्हणत शेअर केली पोस्ट





