निरोप समारंभानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीची धाड; वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्ताची चौकशी पूर्ण

ED Raids | वसई-विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर मंगळवारी (29 जुलै) सकाळी 7:30 वाजता ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ही कारवाई वसई विरार परिसरातील डम्पिंग ग्राऊंड येथे बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारतींच्या बांधकामाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात होती. त्यानंतर रात्री दीड वाजता अधिकारी आयुक्त निवास्थानातून बाहेर पडले.
12 ठिकाणी छापे
या कारवाईत ईडीने कुणालाही ताब्यात घेतले नसून, काही कागदपत्र, हार्ड डिस्कमध्ये मोठा डाटा जमा करून घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात ED कडून पवार यांच्याशी संबंधित एकूण 12 ठिकाणी छापे टाकले असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे अनिलकुमार पवार यांची बदली झाल्यानंतर 28 जुलैला निरोप समारंभ झाला. त्यावेळी पवार यांनी पालिकेतून सर्व कागदपत्रे घरी आणली असल्याने दुसऱ्याच दिवशीच ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. ED Raids |
काय आहे प्रकरण ?
2009 पासून वसई विरार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर निवासी आणि व्यावसायिक इमारती बांधण्यात आल्या. नालासोपारा पूर्वेकडील अधिकृत विकास आराखड्यात मलनिस्सारण प्रकल्प व कचरा डेपो यासाठी आरक्षित जमिनीवर एकूण 41 बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या होत्या. या इमारतींमध्ये खोटे मंजुरीपत्र तयार करून घरे विकण्यात आली. याप्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरु आहे. ED Raids |
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने 8 जुलै 2024 रोजी या सर्व 41 बेकायदेशीर इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र ती फेटाळण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीत या 41 इमारती पाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी यापूर्वीही ईडीने छापेमारी केली होती. याच प्रकरणात दोन महिन्यांत तिसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली आहे. ED Raids |
अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे. त्यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ झाला आणि दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली. मुंबई, पुणे, नाशिक, वसई, विरारसह एकाच वेळी 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. बहुसंख्य छापे पवार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकण्यात आले. या छाप्यांबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे.
हेही वाचा :





