Bhupesh Baghel : छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरी ईडीचा छापा

रायपूर : छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापा टाकला. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सीबीआयच्या पथकाने छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील ६० ठिकाणी छापेमारी केली. ज्यामध्ये राजकारणी, सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सीबीआयचे पथक भूपेश बघेल यांच्या पदुमनगर येथील निवासस्थानी सकाळी दाखल झाले. याशिवाय, सेक्टर ५ चे आमदार देवेंद्र यादव यांच्या घरीही सीबीआयने कारवाई केली. यावेळी, जवळपास अडीच तास वाट पाहिल्यानंतर सीबीआयला आमदार देवेंद्र यादव यांच्या घरात प्रवेश करता आला. मात्र, भिलाई महानगरपालिकेचे महापौर नीरज पाल, एमआयसी सदस्य आदित्य सिंह, अफरोज खान, शरद मिश्रा यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना घरात प्रवेश दिला नाही. दुर्ग जिल्ह्यातील १६ ठिकाणी सीबीआयने छापे टाकल्याची माहिती समोर आली.
यामध्ये माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. आनंद छाब्रा, आयपीएस प्रशांत अग्रवाल, आयपीएस अभिषेक माहेश्वरी यांचाही समावेश आहे. भिलाईमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय ध्रुव यांच्या ३२ येथील बंगल्यांवर सीबीआयने छापा टाकला. तसेच, सेक्टर ९ रोड १७ येथील पोलीस महानिरीक्षक डॉ. आनंद छाब्रा आणि अभिषेक पल्लव यांच्या बंगल्यांवर, राजधानी रायपूरमधील पोलीस महानिरीक्षक शेख आरिफ आणि प्रशांत अग्रवाल यांच्या बंगल्यांवर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक माहेश्वरी आणि अनिल तुतेजा यांच्या भिलाई ३ येथील बंगल्यावर सीबीआयने छापेमारी केली.





