नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी बुधवारी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत हातमिळवणी केली. रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर अनेकदा टीका केली आहे. राजस्थानमध्ये ४ डिसेंबरपासून भारत जोडो यात्रा सुरू आहे. राहुल गांधींसोबतच राजस्थान काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही या यात्रेत सहभागी आहेत.
#BharatJodoYatra welcomes former RBI Governor Raghuram Rajan.
Together for a united India. pic.twitter.com/xy68ot1YQd
— Bharat Jodo (@bharatjodo) December 14, 2022